बँड व्यावसायिकाला पैशांच्या वादावरून बेदम मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा ; भिलपुरा परिसरातील घटना

बातमी शेअर करा...

बँड व्यावसायिकाला पैशांच्या वादावरून बेदम मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा ; भिलपुरा परिसरातील घटना

जळगाव प्रतिनिधी

पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद घालून अलीमोद्दीन शेख किफायत शेख (वय ५४, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण) या बॅण्ड व्यवसायिकाला दोन तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी २:१५ वाजता भिलपुरा चौकात घडली.

अलीमोद्दीन शेख यांचे भिलपुरा चौकात बॅण्डचे कार्यालय आहे. १५ मार्च रोजी सागर चित्ते आणि किशोर जाधव हे त्यांच्या कार्यालयात आले आणि पैशांच्या थकबाकीवरून त्यांनी अलीमोद्दीन यांच्या मोठ्या भावाशी, शाबुद्दीन शेख यांच्याशी वाद घातला. त्यानंतर, त्यांनी अलीमोद्दीन यांना चापट्या आणि बुक्यांनी मारहाण केली. यावेळी, अलीमोद्दीन यांचे दुसरे भाऊ, नुरोद्दीन शेख यांनाही ढकलून देऊन त्यांचा हात मुरगळला. त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली की, जर ते धरणगाव येथे वाजवायला आले तर त्यांना जीवे मारले जाईल.

या घटनेनंतर अलीमोद्दीन शेख यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सागर चित्ते (वय ३५, रा. धरणगाव) आणि किशोर जाधव (वय ३०, रा. धरणगाव) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम