
बंद घराचे कुलूप तोडून सोन्या–चांदीच्या दागिन्यांची चोरी
जळगाव – शहरातील संभाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्या–चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी घरातून एकूण ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून रामानंद नगर पोलिस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास दत्तात्रय सैतवाल (५६, रा. संभाजीनगर) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी बाहेर गेले असताना त्यांच्या घराला कुलूप होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या व चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. दुपारी सुमारास चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सैतवाल यांनी तत्काळ रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोहेकॉ जितेंद्र राठोड पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या हालचालींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम