
बंद घरात घरफोडी ; हजारॊचा ऐवज लांबविला
फैजपूर शहरातील घटना
फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर शहरातील तहानगर भागात चोरट्यांनी एका बंद घरातून लाखांच्या ऐवजाची चोरी केली आहे. या चोरीचा प्रकार तडवीवाडा येथील राजू सुभान तडवी यांच्या भावाच्या घरात घडला.
राजू तडवी यांनी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ते १२ मार्च दरम्यान त्यांच्या भावाच्या घरातील लोखंडी कपाट तोडून त्यात ठेवलेला मुद्देमाल चोरीला गेला. चोरट्यांनी घरातून १५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंग्ज, ७८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोथ, आणि ८ हजार रुपये रोकड असा ऐवज चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच, फैजपूर पोलीस स्टेशनने गुन्हा नोंदवला असून, पोलीस उप निरीक्षक विनोद गाम्हणे यांच्याद्वारे पुढील तपास सुरू आहे. चोरी झालेल्या मालमत्तेचा शोध घेतला जात असून, संबंधित चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम