बंद घरावर डल्ला; ३.२५ लाखांची चोरी उघडकीस, अवघ्या ६ तासांत चोरटा गजाआड

बातमी शेअर करा...

बंद घरावर डल्ला; ३.२५ लाखांची चोरी उघडकीस, अवघ्या ६ तासांत चोरटा गजाआड

चाळीसगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील देवळी गावात बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला मेहूणबारे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी आरोपीकडून वितळवलेले ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दीपक नामदेव पाटील (वय ४८, रा. देवळी) हे १६ मे रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि लोखंडी शोकेसमधील लॉकर फोडून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० मे रोजी उघडकीस आली, त्यानंतर पाटील यांनी मेहूणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे केवळ ६ तासांत आरोपीचा शोध लावण्यात आला. प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, जि. जळगाव) यास अटक करण्यात आली असून, त्याने चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून वितळवलेली ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड हस्तगत केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम