
बंद घर फोडून सव्वा लाखांचे दागिने लांबवले; मोहाडी रोडवरील घटना
बंद घर फोडून सव्वा लाखांचे दागिने लांबवले; मोहाडी रोडवरील घटना
जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : परदेशात मुलाकडे गेलेल्या नागरीकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मोहाडी रोडवरील काळे नगर भागात घडली. ही घटना रविवारी, १ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
लीलाधर शांताराम खंबायत (वय ५१, रा. २१, काळे नगर, मोहाडी रोड, जळगाव) असे तक्रारदाराचे नाव असून, ते आपल्या मुलाकडे ऑस्ट्रेलियात गेले होते. १९ मे ते १ जून या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याची चैन व दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही बाब रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खंबायत यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री ८.३० वाजता त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम