
बकरी वाचवण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
बकरी वाचवण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील देवगाव फाट्याजवळ एका २१ वर्षीय तरुणाचा बकरी पाण्यात बुडाल्याने तिला वाचवण्यासाठी गेला असता त्याचा देखील पाय घसरून पडल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत लहाणु गोमा थैल्लारी (वय ५५ वर्षे, रा.आमदेळ ता. जि.धुळे) यांनी पारोळा पोलीसात खबर दिली. जगन भिमा कोळेकर (ठेल्लारी, वय २१ वर्षे रा.आमदेळ ता.जि.धुळे) हा दि.११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देवगाव ता. पारोळा गावाच्या फाट्याजवळ मेंढपाळ ठेल्लारी कुटुंब तीन-चार दिवसापासून मेंढया चारण्यासाठी छपरे करुन राहत होता. दि.११ रोजी १२ वाजेच्या सुमारास आमच्या मेंढया चारण्यासाठी धनराज कोळेकर, पुतण्या जगन भिमा कोळेकर (ठेल्लारी) असे देवगाव शिवारातील शेतात मेंढी चारण्यासाठी गेले असता मेंढी चारुन ते देवगाव ता. पारोळा गावाच्या फाट्याजवळ पाण्याचा बंधाऱ्यात मेंढीना पाणी पिण्यासाठी घेवुन गेले.
त्या बंधाऱ्याच्या पाण्यात एक बकरी पाण्यात पडल्याने बकरीला पाण्याचा बाहेर काढण्यासाठी मयत जगन भिमा कोळेकर हा बंधाऱ्याचा पाण्यात जात असतांना बंधाऱ्याला लागुन असलेले खडकावर त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडुन बुडून मरण पावला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास निलेश साळुंखे हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम