बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत लावा

बातमी शेअर करा...

बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेऊन चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत लावा

चोपडा तालुका शेतकरी कृती समितीची मागणी

चोपडा (प्रतिनिधी) — शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाची शासनाने तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, अशी ठाम मागणी चोपडा तालुक्यातील शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालयात भेट देत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर केले. यावेळी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कापूस, मका, बाजरी यासह सर्व पिकांच्या उत्पादनाबाबत माहिती देत, विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन चोपडा तालुक्याची पैसेवारी ५० पैशांच्या आत लावण्यात यावी, अशी मागणी केली.

तसेच नागपूर येथे सुरू असलेले आंदोलन दीर्घकाळ चालल्यास तेथील शेतकरी व साथीदारांना अन्नधान्याची गरज पडू शकते, यासाठी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अन्नधान्य पाठवण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

या प्रसंगी एस. बी. पाटील, प्रशांत पाटील, नारायण पाटील, अमृतराव वाघ, समाधान पाटील, अजित पाटील, धनंजय पाटील, गोकुळ चव्हाण, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, भगवान पाटील, सुभाष पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम