बडनेरा-कुरुम दरम्यान स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित

बातमी शेअर करा...

बडनेरा-कुरुम दरम्यान स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित

३ एप्रिलला विशेष ब्लॉक
अमरावती | प्रतिनिधी

बडनेरा-शेगाव खंडातील बडनेरा ते कुरुम स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ३ एप्रिल (गुरुवार) रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल होणार असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या राहणार रद्द
बडनेरा-अमरावती मेमू
अमरावती-वर्धा मेमू
वर्धा-अमरावती मेमू
अमरावती-बडनेरा मेमू

गाड्यांच्या वेळेत बदल
नरखेड-बडनेरा मेमू – नियोजित वेळेपेक्षा ९० मिनिटे उशिरा सुटणार
बडनेरा-भुसावळ मेमू – बडनेरा येथून ९० मिनिटे उशिरा रवाना होणार
ही ब्लॉक प्रक्रिया रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम