बनावट ट्रॅक्टर पार्ट विक्री करणाऱ्या दुकानावर छापा; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

जळगाव: शहरातील एस.टी. वर्कशॉपसमोरील एका दुकानावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे बनावट सुटे भाग विकल्याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १३ हजार ६१५ रुपये किमतीचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले असून, दुकानाच्या मालकाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

शहरातील ‘शहनशाह ट्रॅक्टर अँड अर्थ मुव्हर्स’ या दुकानात महिंद्रा कंपनीच्या नावाचा वापर करून ट्रॅक्टरचे बनावट सुटे भाग विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, कंपनीचे अधिकारी हंबीरराव ज्ञानू साठे (वय ६१, रा. मुंबई) यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. यावेळी, ऑईल फिल्टर, एअर फिल्टर आणि कापडी हूडसारखे अनेक बनावट सुटे भाग आढळून आले, ज्यांची एकूण किंमत १३ हजार ६१५ रुपये आहे.

या प्रकरणी दुकान मालक दीपक नंदलाल पोपली (वय ३२, रा. गणपती नगर) याच्याविरुद्ध कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम