बनावट पार्टस् विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा छापा

बातमी शेअर करा...

जळगाव: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे बनावट पार्टस् वापरून त्यांची विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. अजिंठा चौफुलीवरील या दुकानांमधून ३४ हजार ४१९ रुपये किमतीचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ४ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

शहरातील अजिंठा चौफुलीवरील हायवे टॉवरमधील ‘जळगाव ऑटो सर्व्हिसेस’ आणि ‘शाम ऑटो पार्टस्’ या दुकानांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव वापरून सुटे पार्टस् विकले जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. या माहितीनंतर कंपनीचे अधिकारी परशुराम सुकदेव कारंडे (वय ५०, रा. ठाणे) यांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही दुकानांवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान, दोन्ही दुकानांमध्ये कंपनीच्या नावाचा वापर करून विकले जाणारे एकूण ३४ हजार ४१९ रुपये किमतीचे बनावट सुटे भाग आढळून आले.

या प्रकरणी दुकानांचे मालक मयंक मयूर शहा (वय ३६, रा. मेहरुण तलावाजवळ) आणि सागर करमचंद किंगराणी (वय ३५, रा. सिंधी कॉलनी) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक काळे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम