बऱ्हाणपूर – अंकलेश्वर मार्गाच्या दुरुस्तीची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली पाहणी (पहा व्हिडीओ )
सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर व ठेकेदार यांना काम व्यवस्थित करण्याबाबत दिल्या सूचना
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर बऱ्हाणपूर – अंकलेश्वर मार्गाच्या दुरुस्तीची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली पाहणी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर व ठेकेदार यांना काम व्यवस्थित करण्याबाबत दिल्या सूचना
चोपडा । प्रतिनिधी
मतदार संघातून जाणारा बऱ्हाणपूर – अंकलेश्वर हायवेवरती गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली होती.
रस्त्यांबद्दल तत्कालीन आमदार सौ.लताताई चंद्रकात सोनवणे यांनी आंदोलन केले होते.
ठेकेदार चोपडा यावल रावेरकडच्या कामास दिरंगाई करत असल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामीण नियोजन समितीच्या बैठकीत
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नॅशनल हायवे
(NHAI) अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
त्यानुसार चोपडा मतदारसंघात काम सुरू आहेत. या कामावर प्रत्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे
तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली व सूचना दिल्या.
त्याचबरोबर रत्नावती नदी वरती आशा टाकीज चौकासमोरील पुलाचे कामाची पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर व ठेकेदार यांना विविध सूचना दिल्या काम व्यवस्थित करण्याबाबत देखील सूचना यावेळी दिल्या.
हे ही वाचा 👇
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम