
बलात्कार करणाऱ्याला शरिया कायद्यानुसार मृत्यूदंड द्या; सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनची मागणी
बलात्कार करणाऱ्याला शरिया कायद्यानुसार मृत्यूदंड द्या; सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनची मागणी
जळगाव: राज्यातील वाढत्या महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोपींना इस्लामी शरिया कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले.
फाउंडेशनच्या प्रमुख मागण्या:
बलात्कार प्रकरणांमध्ये कठोर कायदा: फाउंडेशनने म्हटले आहे की, सध्याच्या कायद्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांची हिंमत वाढत आहे. जर बलात्कार प्रकरणात शरिया कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा दिली, तर अशा कृत्यांवर नक्कीच आळा बसेल.पोलीस चारित्र्य पडताळणी बंधनकारक: शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींसोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Verification) करणे बंधनकारक करावे.महिला वाहकांची नियुक्ती: शाळा व महाविद्यालयांच्या बसमध्ये महिला वाहकांची नेमणूक करावी आणि प्रत्येक वाहनात जीपीएस प्रणाली (GPS) बसवणे अनिवार्य करावे.
चोपडा येथील घटनेवर कारवाईची मागणी
या निवेदनात फाउंडेशनने चोपडा येथील एका बस वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका पाच वर्षीय विद्यार्थ्याचा मासिक पास संपल्यामुळे वाहकाने त्याला भर पावसात, निर्मनुष्य ठिकाणी, बसमधून खाली उतरवून दिले. तेथून त्या मुलाचे घर ५ किलोमीटर दूर होते. या चुकीच्या कृत्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, तर त्याला जबाबदार कोण असते, असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिवहन विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकुर बादशाह, शेख जमील, आसिफ शाह, अमान बिलाल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम