
बसची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पाळधी येथील बस स्थानकावरची घटना
बसची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पाळधी येथील बस स्थानकावरची घटना
पाळधी ता. धरणगाव प्रतिनिधी
बस स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या नारायण जुलाल पाटील (वय ७८, मूळ रा. नारद खारद, ता. चोपडा, ह. मु. आव्हाणे, ता. जळगाव) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना पाळधी येथील बस स्थानकावर घडली.
मूळचे चोपडा तालुक्यातील नारद खरद येथील नारायण पाटील हे सद्या आव्हाणे येथे वास्तव्यास होते. ते रेल लाडली येथे जाण्यासाठी पाळधी येथे आले होते. त्यांचा बसला उशीर असल्याने नातेवाईकांना बस स्थानकावर आले. बस स्थानकातील बाकड्यावर बसलेले असतांना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार तेथील प्रवाशांच्या लक्षात येताच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सोशल मीडियावरुन पटली ओळख
पोलिसांनी मयत नारायण पाटील यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावेळी त्यांचे नातेवाईकांनी पाळधी पोलिसात धाव घेत त्यांची ओळख पटवली. त्यांची कोणतीही तक्रार नसल्याने त्यांचे जबाब नोंदवून मृतदेह त्यांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम