बसमध्ये मोबाईल चोरणाऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा...

जळगाव: शहरातील नवीन बस स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मंगल मुलचंद पाटील (वय ६३, रा. पाडळसरे, ता. अमळनेर) हे दोंडाईचा-अमळनेर मार्गे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होते. बस जळगावच्या नवीन बस स्थानकात थांबली असताना, गौरव जगन कोळी (वय २२, रा. गेंदालाल मिल) या तरुणाने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातून ५,५०० रुपये किमतीचा मोबाईल चोरला.

मात्र, मंगल पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित गौरव कोळीला जागेवरच पकडले. त्याच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गौरव कोळीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार नरेश सोनवणे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम