बसस्थानकात महिलेचे ३ तोळे सोन्याचे दागिने चोरीला

बातमी शेअर करा...

बसस्थानकात महिलेचे ३ तोळे सोन्याचे दागिने चोरीला

चोपडा बसमध्ये चढत असताना घडला प्रकार

जळगाव : शहरातील बसस्थानक आणि टॉवर चौक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दागिने चोरण्याच्या घटना वाढत आहेत. मंगळवारी (२० मे २०२५) सायंकाळी अशीच एक घटना घडली, ज्यात चोपडा येथील रत्ना प्रताप कंखरे (वय ५२, रा. चहार्डी, ता. चोपडा) यांच्या बॅगमधून ३ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.रत्ना कंखरे मंगळवारी आपल्या मुलीसह जळगावातील अयोध्यानगर येथे लग्न समारंभासाठी आल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता चोपडा बसमध्ये परतताना बसमधील गर्दीचा फायदा घेत दोन महिला चोरांनी त्यांच्या बॅगमधील दागिन्यांची डबी चोरली. कंखरे यांनी चोरांचा हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्यांनी डबी घेऊन पळ काढला. कंखरे यांनी आरडाओरड केली, तरी चोरट्या पसार झाल्या. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांत तक्रार नोंदवली.सोमवारी टॉवर चौकातही असाच प्रकार घडला होता, ज्यात चोपडा येथील एका महिलेचे दागिने चोरीला गेले. गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानक आणि टॉवर चौक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून, पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम