
बसस्थानक परिसरातून मालवाहू वाहनाची चोरी
बसस्थानक परिसरातून मालवाहू वाहनाची चोरी
देवळी येथील घटना ; पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील देवळी बसस्थानक परिसरात उभे केलेले मालवाहू वाहन अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी मंगळवारी दि. १० डिसेंबर रोजी उघडकीस आली असून, वाहनाचा बराच शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
अनिल सुभाष पाटील (वय ३७, रा. देवळी, ता. चाळीसगाव) यांनी आपले मालवाहू वाहन बसस्थानकाजवळ उभे केले होते. काही वेळानंतर परत आल्यानंतर वाहन जागेवर दिसून न आल्याने परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र वाहनाचा कोणताही मागमूस न लागल्याने पाटील यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. देवळी परिसरात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम