
बस स्थानकात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याची संभाजी सेनेची मागणी
बस स्थानकात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याची संभाजी सेनेची मागणी
चाळीसगाव:-(प्रतिनिधी)
बस स्थानकात नेहमीच चोरीच्या घटना घडतातच परंतु बस स्थानक परिसरात महिलांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे, ग्रामीण भागातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी तसेच अनेक महिला भगिनी या देखील बाजार हाट म्हणा किंवा काहीना काही कामा निमित्ताने रोज शहरात येत असतात, बऱ्याचदा बस स्थानक परिसरात छेड खाणीच्या घटना तर घडताच शिवाय महिला शौचालयाची सुविधा देखील पाहिजे तशी नसल्याच्याही तक्रारी आहेच परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महिला शौचालया कडे जाणाऱ्या बाजूने कोणत्याही प्रकारे सी सी टीव्ही कॅमेरे नाहीत, गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी महिला शौचालया मध्ये एक तरुण महिलेचे कपडे परिधान करून गेला होता आणि त्याने एका अल्पवयीन मुलीचे शूटिंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ही बाब मुलीच्या लक्षात येताच तिने प्रसंगावधान राखत बाहेर येऊन आरडा ओरड केली त्यावेळी तिथे ड्युटीवर असलेल्या होमगार्ड यांनी त्याला ताब्यात देखील घेतले होते परंतु त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
तरी तात्काळ १५ दिवसांच्या आत महिला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आणि आवश्यक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे बसवावेत अन्यथा संभाजी सैनिक बस स्थानकात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी.
अशा आशयाचे निवेदन आगार प्रमुख मयूर पाटील यांना दिले निवेदनावार संभाजी सेना शहर प्रमुख आबासाहेब सौंदाणे, रोजगार आघाडी प्रमुख अविनाश काकडे, मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठलसिंग राजपूत, सोशल मीडिया प्रमुख सचिन जाधव, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बनकर तालुका उपाध्यक्ष प्रवीण पाटील विद्यार्थी शहर प्रमुख सौरभ देशमुख आदींच्या सह्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम