बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा...

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील डिप्लोमा इन जर्नालिझम, बी.ए.एम.सी.जे., एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद व पत्रकारिता) या अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत आहे. या अभ्यासक्रमांसोबतच डिजिटल व सोशल मीडिया, कॅमेरा हॅंडलिंग, व्हिडिओ एडिटींग, रेडिओ जॉकी, रायटिंग फॉर न्यूजपेपर, न्यूजपेपर पेजिनेशन, जनसंपर्क अशा तीन महिन्यांच्या सात कौशल्याधारित व रोजगाराभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nmu.ac.in भेट देवून https://nmuj.digitaluniversity.ac या ऑनलाईन अ‍ॅडमिशन लिंकवर क्लिक करून प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर (मो. ८४०७९२२४०४), डॉ. गोपी सोरडे (मो. ९८३४१६६०७२) यांच्याशी किंवा कार्यालयीन वेळेत ०२५७-२२५७४३६ / २२५७४३८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम