
बांधकामा ठिकाणी जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू
बांधकामा ठिकाणी जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू
जळगाव : बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सादीक मेहबूब पिंजारी (वय ३५, रा. नशिराबाद) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नशिराबाद येथे बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना दि. ३० ऑगस्ट रोजी पिंजारी हे पहिल्या मजल्यावरून पडले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम