बांधकाम परवानगी प्रकरणात टीडीआरची सक्ती रद्द करावी

बांधकाम व्यावसायिकांची नगरपरिषदेकडे मागणी

बातमी शेअर करा...

बांधकाम परवानगी प्रकरणात टीडीआरची सक्ती रद्द करावी

बांधकाम व्यावसायिकांची नगरपरिषदेकडे मागणी
अंबरनाथ प्रतिनिधी
बांधकाम परवानगी प्रकरणात टीडीआरची सक्ती रद्द करावी अशी मागणी नगर परिषदेच्या मुख्याधिकऱ्यांकडे निवड देऊन करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे कि,
23 डिसेंबर 2024 रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील विकास बांधकाम परवानगी प्रकरणांमध्ये मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम क्र.६.३ मधील तक्ता क्र.६जी च्या सह असलेली तरतुद क्र (चार) मध्ये नमूद केल्याप्रमाणे टेबल नं.६ए व ६जी मध्ये कॉलम क्र.९ नुसार कमाल बांधकाम क्षेत्राच्या मर्यादेत व कॉलम क्र.७ व ८ मध्ये नमूद कमाल अधिमूल्य व टि.डी.आर. यांचे मर्यादेत राहून अधिमूल्य व टि.डी. आर. समान प्रमाणात वापरण्यात यावा. असे आदेशीत केले आहे. मात्र या आदेशामुळे खुद्द नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून, बांधकाम व्यावसायिकांना देखील ते परवडणारे नाही. केवळ काही ठराविक बिल्डरांसाठी सदर चा आदेश काढण्यात आला आहे का? अशी शंका येते.
त्यामुळे सदर चा आदेश त्वरित रद्द करावा व सर्वसामान्य बांधकाम व्यावसायिकांना न्याय द्यावा. अन्यथा सदर च्या आदेशाविरोधात उप मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे दाद मागावी लागेल. याची नोंद घ्यावी.असे म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम