बागवान समाजाने उच्च शिक्षण घेऊन समाज व देशाची सेवा करावी : करीम सालार

बातमी शेअर करा...

बागवान समाजाने उच्च शिक्षण घेऊन समाज व देशाची सेवा करावी : करीम सालार

जळगाव येथे बागवान फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजसेवकांचा गौरव करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी आणि प्रेरणादायी वक्तृत्व सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक खालिद बागवान हे होते. कार्यक्रमाला इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, एजाज मलिक, अशपाक बागवान, सोहेल अमीर शेख, हाजी गुलाब बागवान, हाजी रशीद बागवान, हाजी शफी बागवान आणि जाहेद शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलमान मुश्ताक बागवान यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झिया सर यांनी तर आभार प्रदर्शन जावीद सर यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण मांडणी अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम