
बाल मावळ्यांतर्फे शिवजयंतीनिमित्त किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नूतन अजिंठा हौसिंग सोसायटीमध्ये कार्यक्रम
बाल मावळ्यांतर्फे शिवजयंतीनिमित्त किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नूतन अजिंठा हौसिंग सोसायटीमध्ये कार्यक्रम
जळगाव : येथील नूतन अजिंठा हौसिंग सोसायटीतील बाल मावळ्यांनी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
याप्रसंगी किल्ल्याची प्रतिकृती तयार करुन सर्व बाल मावळ्यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मावळ्यांमधील कु. लक्षिता पाटील हिने राजमाता जिजाऊ तसेच चि. स्पंदन गोविलकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक वेशभुषा केली होती.
याप्रसंगी कु. पूजा चौधरी, कु. अव्दिका नायर, कु. दिपीका वाघमारे, चि. अस्मित पाचपांडे, कृतिका पाटील, पूर्वा चौधरी तसेच सौ. सुनिता पाटील, सौ. अलका महाजन, सौ. भाग्यश्री पाटील, सौ. शैला पाचपांडे, सौ. सविता पाटील, सौ. रिना वाघमारे, सौ. नेत्रा गोविलकर, श्री. बी. बी. पाटील, श्री. समीर गोविलकर आदि उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम