बातमीदार |दि २३ जानेवारी २०२४
अन्नत्याग उपोषण : बालकल्याण समिती बरखास्त करा, विदयार्थी संघटना ठाम
उपोषणाला जिल्हा वकिल संघाचा पाठिंबा
जळगाव – खडके बालगृह अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या बालकल्याण समितीला बरखास्त करण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या ५ दिवसापासून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाला दिनांक २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा वकील संघाने पाठिंबा दिला.
महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे राज्य उपाध्यक्ष ऍड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी दि. १९ जानेवारी पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दिला आहे.
https://fb.watch/pNAU7Xw59Z/?mibextid=Nif5oz
प्रशासनाकडून समिती बरखास्तीचा निर्णय नाही
बाल लैंगिक सारख्या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बालकल्याण समितीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होत. मात्र तसं न झाल्याने पीडित बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘मासू’ विद्यार्थी संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केले आहे, उपोषणाला ५ दिवस उलटून देखील समिती बरखास्त करण्यासंदर्भात प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. सदर बाब गंभीर आहे.
चौकशी पुर्ण पण…
बाल कल्याण समितीतील तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर सदस्यांची राज्य चौकशी समितीद्वारे ऑगस्ट – २०२३ महिन्यातच चौकशी पुर्ण झालेली आहे.
खडके बालगृह अत्याचार प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे दि.२६.जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. प्रकरण गंभीर असून समिती बरखास्त होत नसल्याने आश्चर्य वाटत असल्याचे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.
काय आहे प्रकरण…
जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटना घडल्या प्रकरणी बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य संदीप पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आहेत मागण्या…
१) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा असणारी बाललैंगिक शोषणाची, गुन्ह्याची माहिती असतांना देखील माहिती दडवून ठेवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल न करता आरोपीची एक प्रकारे साथ देऊन गुन्ह्यात सहभाग असलेल्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष – श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य – श्रीमती विद्या बोरणार, सदस्य -संदिप पाटील या तिघांचे तात्काळ निलबंन करण्यात यावे.
२) बाल कल्याण समितीतील अध्यक्ष /सदस्य ही समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
३) या तीन महाशयांना या पुढे शासनस्तरावर कोणत्याही शासकीय समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात येवु नये.
४) या तीन महाशयांना बालकल्याण समिती येथे येण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
जळगाव जिल्हा वकील संघाचा पाठिंबा
बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी सुरु असलेल्या अन्न त्याग उपोषणास जळगाव जिल्हा वकिल संघाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला असून उपोषणस्थळी वकील संघांचे अध्यक्ष ॲड. रमाकांत पाटील, सचिव कल्याण पाटील,
माजी सचिव ॲड. आनंद मुजुमदार, माजी सचिव सुभाष तायडे, माजी अध्यक्ष कैलास भाटीया, विधी सरकारी वकील ॲड. राजेश गवई, ॲड, सुनिल इंगळे, ॲड. लिना म्हस्के, ॲड. वैशाली चौधरी, ॲड. पल्लवी जोशी, ॲड. परिनिता फेगडे, ॲड. रुपाली शिवदे,
ॲड. माधुरी बडगुजर, ॲड. निशांत शिंपी, ॲड. दिपक सोनवणे, ॲड. राजकुमार हरणे, ॲड. अर्जुन खैरनार, ॲड. सुकलाल सुरवाडे, ॲड. समाधान सुरवाडे, ॲड. दाजीबा भालेराव, ॲड. अरुण चव्हाण, ॲड. प्रशांत बाविस्कर यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा👇
अटक – वर्डी फाट्यावर गावठी कट्ट्यासह तिन आरोपींना अटक
स्नेहमिलन – जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलनाचे आयोजन
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम