बालविश्व इंग्लिश मीडियम शाळेत “नारीचा सन्मान” कार्यक्रम उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

बालविश्व इंग्लिश मीडियम शाळेत “नारीचा सन्मान” कार्यक्रम उत्साहात साजरा

जळगाव,निवृत्ती नगर, ऑक्सिजन पार्कच्या मागे असलेल्या बालविश्व इंग्लिश मीडियम शाळेत “नारीचा सन्मान” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे पठण करून स्त्रीशक्तीचा गौरव केला. मुख्य अतिथी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती चौधरी आणि संस्थेचे डायरेक्टर चि. सौरभ चौधरी यांनी आपल्या भाषणात नारीच्या समाज घडवणाऱ्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि तिच्या योगदानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींचे पूजन करून त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मृणालिनी कुरंभट्टी यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. लतिका उपासनी यांनी केले. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे स्त्रीविषयक आदर आणि समानतेची जाणीव वाढत असल्याचे नमूद केले.

हा कार्यक्रम स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये “नारीचा सन्मान” करण्याची प्रेरणा जागवणारा ठरला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम