
बिबट्याने नीलगायीचा पाडला फडशा
जामनेर तालुक्यातील वडाळी शिवारातील घटना
पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या वडाळी शिवारात मध्यरात्री बिबट्याने नीलगायीचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरातीलभीतीचे वातावरण आहे. वाकोद येथील शेतकरी शाहरुख शेख यांच्या हरी नगर शिवारातील मक्याच्या शेतात मध्यरात्री बिबट्याने नीलगायीचा फाडशा पाडला. यामुळे शेतकरी घाबरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता , शेत शिवारात एकटे जाण्याचे टाळावे, तसेच लहान बालकांना सोबत नेऊ नये, असे आवाहन वडाळी येथील सरपंच संजय बनसोडे यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम