बिलवाडी हाणामारी प्रकरणात आणखी एकाला अटक, आरोपींची संख्या आठवर

बातमी शेअर करा...

बिलवाडी हाणामारी प्रकरणात आणखी एकाला अटक, आरोपींची संख्या आठवर

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बिलवाडी येथे झालेल्या भीषण हाणामारीत एकनाथ निंबा महाजन (गोपाळ) (वय ५५, रा. बिलवाडी) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी कल्पेश पाटील याला अटक केली आहे. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशीही गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बिलवाडी गावात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून मोठा संघर्ष उभा राहिला होता. यात एकनाथ महाजन यांचा मृत्यू झाला तर तब्बल १२ जण जखमी झाले होते. या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. आता गुन्हा दाखल असलेला आठवा आरोपी कल्पेश पाटील यालाही एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

दरम्यान, सोमवारी गावात झालेल्या तोडफोड आणि दुचाकी जाळण्याच्या घटनांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गावात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम