बीडच्या अर्धमसला गावात मशिदीत स्फोट

पोलिसांनी दोन संशयितांना केली अटक

बातमी शेअर करा...

बीडच्या अर्धमसला गावात मशिदीत स्फोट

पोलिसांनी दोन संशयितांना केली अटक
बीड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रविवारी मध्यरात्री स्फोट झाल्याने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन ते चार तासांत दोन संशयितांना अटक केली. सदर घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असले तरी पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे शांतता राखण्यात यश आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, जिलेटिन कांड्यांचा वापर करून हा स्फोट घडवण्यात आला. स्फोटानंतर गावाच्या माजी सरपंचांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सरपंचांच्या सहकार्यामुळे अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले.

प्राथमिक तपासानुसार, उरूस मिरवणुकीतील किरकोळ वादातून हा स्फोट घडवण्यात आल्याचा अंदाज आहे. घटनेच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गावातील वातावरण शांत असून मशिदीची स्वच्छता करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी एकजूट दाखवत सामंजस्याने वागण्याचे आवाहन केले आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम