बातमीदार| मंगळवार दि ३० जानेवारी २०२४
Allumini Meet – बी फार्मसी महाविद्यालयात अल्युमिनी मीटचे यशस्वी आयोजन –
तब्बल १८ वर्षांनंतर विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात; जुन्या स्मृतींना उजाळा
चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २००१ ते २००५ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अल्युमिनी मीटचे आयोजन दि २७ रोजी आयोजन करण्यात आले होते. बी-फार्मसी-allumini-meet
Also Read: धार्मिक – महावीर नगरात ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे
तब्बल १८ वर्षांनंतर विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात आले होते. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रा डॉ गौतम वडनेरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या असलेल्या सर्वांगीण विकासाची व विद्यार्थ्यांना प्रती महाविद्यालय करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आलेल्या विद्यार्थ्यांनी ते शिकत असतांना असलेल्या विविध वर्ग व प्रयोगशाळाना भेटी देऊन आपल्या स्मृतींना उजाळा दिला. बी-फार्मसी-allumini-meet
https://fb.watch/pUOpMWbvon/?mibextid=Nif5oz
सोबत आताच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी पुढील भावी व्यवसायिक आयुष्यामध्ये सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. अल्युमिनी मीट साठी प्रामुख्याने प्रा डॉ योगेश पवार, हर्षल लोखंडे,
भूषण झांबरे, पियुष महाजन, पंकज राणे, प्रणाली झांबरे, मोनाली सोनवणे, नीता बागड, पल्लवी कोल्हे, शीतल चित्ते, विशाखा चौधरी व इतर मित्र परिवार उपस्थित होता. बी-फार्मसी-allumini-meet
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बी-फार्मसी- शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. बी-फार्मसी-allumini-meet
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम