बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये तान्हा पोळा सण उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

बी.यू.एन. रायसोनी स्कूलमध्ये तान्हा पोळा सण उत्साहात साजरा
मातीचे बैल सजवून चिमुकल्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृतीची झलक

जळगाव (प्रतिनिधी) : प्रेमनगर येथील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सीबीएसई पॅटर्न) येथे आज दि. २१ ऑगस्ट रोजी पारंपरिक “बैलपोळा / तान्हा पोळा” सण उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी ते सिनिअर केजीपर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या मातीच्या बैलांना रंगीबेरंगी सजावट करून शाळेत सादर केले. लहान शेतकऱ्यांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी पाहून संपूर्ण परिसरात ग्रामीण संस्कृतीची झलक खुलून आली.

तान्हा पोळा म्हणजे वासरांना सजवून, हळदीकुंकवाचा मान देऊन व गोडधोड खाऊ घालून साजरा केला जाणारा पारंपरिक सण. मुलांनी या परंपरेत उत्साहाने भाग घेतला. मातीच्या बैलांची सजावट, खेळ-गाणी व छोटेखानी मिरवणुकीत सहभाग घेत कृषिप्रधान संस्कृतीचा आनंद लुटला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना बैलपोळ्याचे महत्व आणि ग्रामीण जीवनाशी असलेले नाते समजावून सांगितले. याप्रसंगी पालक-शिक्षक संघाच्या सदस्या सौ. माला माळी, शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीष रायसोनी व उपाध्यक्ष श्री. उमेद रायसोनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमातून ग्रामीण परंपरा आणि कृषिसंस्कृतीचा वारसा चिमुकल्यांपर्यंत पो

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम