
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिन नियमित राबविण्यात यावा..
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिन नियमित राबविण्यात यावा..
शेगाव / प्रतीनीधी
शेगाव येथील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिन नियमित राबवण्याबाबतची, अशी मागणीचे नम्र निवेदन मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी शेगांव .मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा. यांच्याकडे नम्र निवेदनाद्वारे दि.28 जुलै 2025 रोजी करण्यात आली आहे. सदर निवेदन अर्जावर म्हटले आहे. की, जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील नागरिकांच्या प्रकारच्या विविध तक्रारी वेळेत पारदर्शक पद्धतीने प्रशासन, जनतेशी थेट संवाद घडावा तसेच शासनाच्या सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यात या उद्देशाने तक्रार निवारण दिन मा. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुकास्तरावर तहसील कार्यालयात घेण्यात यावा, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थित राहूल आपली लेखी स्वरूपात विविध समस्या, मागणीचे विनंती अर्ज,नम्र निवेदन,तक्रारी, स्मरणपत्र, तालुका लोकशाही दिन अर्ज नागरिकांच्या समस्यांवर आणि शासकीय योजनेचा अंमवलबजावणीत येणाऱ्या अडथडांळ्यावर थेट संवाद साधण्यासाठी तक्रार निवारण दिन बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर तहसील कार्यालय नागरिकांच्या अडचणीवर तातडीने कारवाई व्हावी. बैठकीत शहर तालुक्यातील सर्व प्रशासकीय, शासकीय कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोणतीही तक्रार प्रलंबित राहणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी पारदर्शकतणे व उत्तरदायिकतेने काम करावे. दर सोमवारी तक्रार निवारण दिन घेण्यात यावा. या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील समय सुचिकता नागरिक शासनबद्दल विश्वास निर्माण होईल. तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन नियमितपणे घेऊन शासकीय सेवा अधिक व गतिमान व पारदर्शक होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. प्रत्येक तहसील कार्यालय नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा, त्यामुळे नागरिकांच्या समस्या त्वरित होईल, ही नम्र विनंती. अशी मागणी अनंत रमेश माळी सामाजिक कार्यकर्ता, विश्वंभर चिंचोले, गणेश टाले,पंकज लढाड, रितेश कळसकार, निखिल खटवानी, अजय बावणे, रामकुमार गुप्ता, वैभव राहणे, रमेश माळी, दत्तात्रय तायडे यांच्या स्वाक्षऱ्यासह
निवेदनाच्या प्रतिलिपी
1 मा श्री.ना मकरंदजी जाधव पाटील पालकमंत्री बुलढाणा. महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई.
2 मा.विभागीय आयुक्त
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.यांना देण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम