बेंडाळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी संविधान पाठांतर स्पर्धेत प्रथम व द्वितीय

बातमी शेअर करा...

बेंडाळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी संविधान पाठांतर स्पर्धेत प्रथम व द्वितीय

 

जळगाव: स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘का. राजेंद्र भालेराव स्मृती संविधान जागर करंडक-संविधान पाठांतर स्पर्धा’ ‘मूलभूत अधिकार’ या विषयावर घेण्यात आली. या स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आंतरमहाविद्यालयीन गटात उत्कृष्ट कामगिरी केली.

या स्पर्धेत बेंडाळे महाविद्यालयाच्या कु. कावेरी सुनील नेरकर (राज्यशास्त्र विभाग) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला प्रमाणपत्र, रुपये ५००/- रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच, कु. आलिया बी अमजद रंगरेझ (राज्यशास्त्र विभाग) हिने द्वितीय क्रमांक मिळवला आणि तिला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या दोन्ही विद्यार्थिनींना त्यांच्या यशासाठी राज्यशास्त्र विभागाचे प्रा. शांताराम तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे आणि उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम