बेंडाळे महाविद्यालयाच्या दहीहंडी उत्सवात महिला गोविंदांचा थरार…

बातमी शेअर करा...
बेंडाळे महाविद्यालयाच्या दहीहंडी उत्सवात महिला गोविंदांचा थरार…

 डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथील जिमखाना विभागाकडून सालबादाप्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी ‘दहीहंडी उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते.
  महाविद्यालयाच्या दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.जे.पाटील हे होते.दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन ॲड.शिल्पा रावेरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.परंपरेने पुरुषप्रधान राहिलेल्या दहीहंडी उत्सवात महिलांना देखील प्राधान्य मिळावे या हेतूने, लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाने २००९ पासून जळगाव जिल्ह्यात महिला दहीहंडी उत्सवाला महाविद्यालयातून सुरुवात केली होती. सामाजिक व सांस्कृतिक परंपरेने सुरू झालेला या दहीहंडी उत्सवाचे साहसी खेळात रूपांतर झाले.
. या दहीहंडी उत्सवात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी
 डी.जे.गीतांच्या तालावर सुंदर व शिस्तबद्ध नृत्य सादर करत, उंच मनोरे रचून, विविध कौशल्य दाखवीत, ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या गजरात ओले चिंब होवून महिला गोविंदांनी रोमांचकरित्या दहीहंडी फोडली.
. ‘दहीहंडी म्हणजे केवळ थर लावणे नाही,तर ती समाजाला बांधून ठेवणारी भावना आणि एकजुटतेची ओळख या उत्सवातून मिळते’अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. पाटील यांनी दिली.
. या उत्सवाचे आयोजन जिमखाना विभागाने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन केले. उपप्राचार्य डॉ. पी.एन.तायडे,डॉ. सत्यजित साळवे,सौ.सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालिका डॉ.अनिता कोल्हे यांनी दहीहंडी उत्सवाचे यशस्वी आयोजन केले.त्यासाठी जिमखाना विभागातील क्रीडा शिक्षिका सौ.छाया चिरमाडे व शिक्षकेत्तर सहकारी श्री.संजय सुरवाडे यांचे सहकार्य लाभले.
. या आनंदोत्सवात महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थिनींनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम