
बेंडाळे महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
बेंडाळे महाविद्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
डॉ. अण्णासाहेब जी. डी, बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), येथे राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर मु. जे. महाविद्यालयाचे प्रा. भूषण धनगर यांचे व्याखान संपन्न झाले. त्यानिमित्ताने प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रा. धनगर यांनी आपल्या मनोगतातून माहिती अधिकारासबंधी विविध देशातील स्थिती, माहिती अधिकारासंबंधी मा. सर्वोच्च न्यायालय व विविध मा. उच्च न्यायालयाचे निकाल, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे महत्व, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळविण्याची प्रक्रिया, माहिती अधिकारी आणि त्यांचे कार्य, माहितीचा अधिकार आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी माहितीचा अधिकार नागरिकांसाठी लोकशाहीचे प्रभावी आयुध असून त्याचा विद्यार्थीनींनी विधायक व लोककल्याणाच्या कामासाठी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी वापर करावा असा मोलाचा संदेश दिला. डॉ. मोनाली खाचणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शांताराम तायडे यांनी तर आभार प्रा. सायली पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. विनोद नन्नवरे, प्रा. राजेश कोष्टी, प्रा. नुरी तडवी, प्रा. करण थोरात, प्रा. मंगेश किनगे आणि भावेश तायडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला डॉ.देवेंद्र बोंडे, प्रा.सुनील अहिरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम