बेंडाळे महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

बातमी शेअर करा...

बेंडाळे महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

जळगाव: डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात (स्वायत्त) आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाची ग्रंथालय समिती, मराठी भाषा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य श्रीमती सुनिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. यावेळी इंग्रजी विभागाचे प्रा. सुनील अहिरे यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.या प्रसंगी “जीवनात यशस्वी होण्यासाठी “वाचन” ही पहिली पायरी आहे, वाचनाने ज्ञान समृद्ध होते ” असा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती सुनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथांचे वाचन करून या दिवसाचे औचित्य साधण्याचे विद्यार्थिनीना आव्हान केले.

या प्रसंगी ग्रंथालया कडून “ग्रंथ प्रदर्शनी” चे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थिनीनी वाचन संस्कृती जोपासण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेश कोष्टी यांनी केले तर आभार ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.देवेंद्र बोंडे यांनी केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, ग्रंथालय समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम