बेटावदमधील खून प्रकरणात अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यांचा जळगाव दौरा

बातमी शेअर करा...

बेटावदमधील खून प्रकरणात अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यांचा जळगाव दौरा

मयताच्या कुटुंबियांना 5 लक्ष मदत निधी देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार

जळगाव : बेटावदमधील सुलेमानखान रहिमखान पठाण या युवकाच्या खून प्रकरणाची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने दखल घेत या प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांच्या निर्देशानुसार आयोगाचे सदस्य अहेमद शरीफ व शेख वसीम यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

आयोगाच्या सदस्यांनी सर्वप्रथम मयत सुलेमान खान यांचे बेटावद खु येथील निवासस्थानी भेट दिली यानंतर जामनेर मध्ये जाऊन मयताच्या परिवाराची भेट घेऊन अल्पसंख्यांक आयोग खंबीरपणे आपल्यासोबत असल्याची ग्वाही देत आपले झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही परंतु आपल्या परिवाराचा एकमेव असलेला आधार हिरावल्याने 5 लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केरून सदर गंभीर प्रकरणाची हकीकत जाणून घेत दोषींवर कडक कार्यवाही करण्यासंदर्भात आयोगाची भूमिका असल्याचे स्पष्ट करत आपल्याला न्याय मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले

आयोगाचे सदस्य अहेमद शरीफ व शेख वसीम यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली काम न करता मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याबाबत व भविष्यात अश्या घटना होऊ नये म्हणून कठोर कार्यवाही कारण्यातबाबत निर्देश देऊन फरार असलेले व पोलीस तपासात निष्पन्न झालेले आरोपी तात्काळ अटक करण्यात यावे असं निर्देश दिले .

अल्पसंख्यांक आयोगाच्या भेटीदरम्यान मयताच्या कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक कासार यांच्या कार्यावर संकोच उपस्थित केल्याने तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचा तपास कासार यांच्याकडून काढून घेत चोपडा उपविभागीय अधिकारी घोलप यांच्या कडे सुपूर्द केला

आयोगाचे सदस्य अहेमद शरीफ व वसीम शेख यांची जवळपास अर्धा तास पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांच्या सोबत बंद दारा आड चर्चा झाल्याने या प्रकरणाची गांभीर्यता व तपासाची गती वाढणार असल्याचे समजते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम