बेटावद खुर्द मॉब लिंचिंग प्रकरण – मुख्य आरोपीला तात्काळ अटक व मकोका लागू करण्याची एकता संघटनेची मागणी

बातमी शेअर करा...

बेटावद खुर्द मॉब लिंचिंग प्रकरण – मुख्य आरोपीला तात्काळ अटक व मकोका लागू करण्याची एकता संघटनेची मागणी

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी हा राजकीय प्रभावाचा मानला जात असून, अद्याप त्याला अटक न झाल्याने जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यावर कठोर कारवाईची मागणी करत जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले.

निवेदनात मुख्य आरोपी व कॅफे चालकाला तात्काळ अटक करून, गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम १२०(ब) म्हणजेच बीएनएस ६१(२) अंतर्गत कटकारस्थान, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवून पीडिताच्या निवडीप्रमाणे सीआरपीसी कलम २४(८) अंतर्गत विशेष सरकारी वकील नेमावा, अशीही मागणी संघटनेने केली.

या प्रकरणात पीडित व्यक्तीवर संघटित टोळीने जीवघेणा हल्ला करून हत्या केल्याचा आरोप असून, आरोपींचा पूर्वेतिहास गंभीर गुन्ह्यांनी भरलेला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाला आळा घालून निष्पक्ष व कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम