बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

बातमी शेअर करा...

बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

विटनेर येथील घटना

जळगाव प्रतिनिधी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील रहिवासी असलेल्या एका 17 वर्षीय युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शंकर राठिया मेहता वय 17 राहणार भगवानपुरा जिल्हा खरगोन असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शंकर मेहता या तरुणाला दारूचे अत्यंत व्यसन असल्यामुळे तो या व्यसनापायी सात आठ दिवस घरातून निघून जायचा. तो गेल्या सात-आठ दिवसापासून बेपत्ता असल्याने आज सकाळी विटनेर शिवारामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला उग्र वास आल्याने त्यांनी बघितले असता शंकर या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत झाडाला मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून तो मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शव आणण्यात आला. यावेळी शंकर याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम