बेशिस्त वाहनांमुळे रहदारीचा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर..

बातमी शेअर करा...
बेशिस्त वाहनांमुळे रहदारीचा रस्ता बंद होण्याच्या मार्गावर..
शेगांव शहर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष..
शेगाव /प्रतीनीधी
शेगाव शहरातील मध्यवर्ती नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. पाच ते स्वामी विवेकानंद चौक  पर्यंत रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या  वाहनावर नियमित  कारवाई करण्याची, अशी मागणीचे तक्रार मा. पोलीस निरीक्षक ,पोलीस स्टेशन शेगांव मार्फत मुख्यमंत्री मा श्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे तक्रार अर्ज 25 जून 2025 रोजी  करण्यात आली आहे.सदर तक्रार अर्जावर म्हटले आहे. की, शेगाव शहरातील मध्यवर्ती मुख्य रस्त्यावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस कठीण होत असून मुख्य रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीवर शहर पोलीस प्रशासनाच्या त्वरित उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. शेगांव तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत श्रींच्या पालखी मार्गावरील रस्तेची लांबी रुंदी मोठी करुण अतिक्रणमुक्त करण्यात आले होते. मात्र आज रोजी रस्ते अरुंद होत चाललेले दिवसेंदिवस दिसत आहे. अतिक्रमणचा भरणा दोन्ही बाजूंनी कायम असून  नियमित जैसे थे आहे. त्यामुळे विक्री करणारे फेरीवाले मुख्य रस्त्यावरून जाताना येताना सर्व शहरातील, तालुक्यातील पदचारी नागरिक, महिला, वयोवृद्ध,शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनी त्रस्त झाले आहे. रस्त्यावर  त्यांच्या हातगाड्या मुख्य रस्त्यावर लावून रहदारीला अडथळा निर्माण करतात.भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावर दुकान थाबतात. एक साईड संपूर्ण रस्ता बंद झाला आहे .काही दिवसानंतर सर्विस रोड वरील रस्ता बंद होण्याच्या मार्गावर चित्र दिसत आहे. यात तळमात्र शंका नाहीच. या मार्गावरील नियमित सर्व व्यावसायिक आपले सर्व प्रकारचे वाहन रस्त्यावर लावत असल्यामुळे एखाद्या दिवशी मोठी घटना, अपघात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्यक्ष दर्शनी  मुख्य रस्त्याची मा. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ,मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद, पोलीस निरीक्षक ,पोलीस स्टेशन शेगांव. यांनी पाहणी करून सर्व बेशिस्त वाहने रस्त्यावर लावल्यास नियमित दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात यावी ,अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे. पूर्वीपासून शेगांव शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असल्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व नागरिक या रस्त्याचा नियमित उपयोग करत असून   हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक ,नगर परिषद  प्राथमिक मराठी शाळा क्र.5 ,
स्वामी विवेकानंद इंग्लिश ज्ञानपीठ श्रीराम नगर, अण्णाभाऊ साठे चौक, सर्व दवाखाना,श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्र , महेश चौक, गुरुदेव चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, भैरव चौक, राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळा, श्री. संत गजानन महाराज  मंदिर पश्चिम गेट कडे जाण्याचा रस्ता जुने शहर सर्वत्र रस्त्याला जोडणारा सरळ मार्ग असल्यामुळे शेगांव मध्यवर्ती बसस्थानक शिवशाही बस ,एस टी बस , स्कूल बस, ॲम्बुलन्स, न प अग्निशामक  सर्व प्रकारचे वाहन वळण घेताना  मोठा अपघात शक्यता नाकारता येत आहे. तरी
 तक्रार अर्जाच्या प्रतिलिपी दि. 30.6.2025 मा. जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा. यांना प्रत्यक्ष अर्ज देण्यात आले आहे.  वरील विषयाकडे मा.पोलीस निरीक्षक काय कारवाई करतात. यांचे सर्व लक्ष शहर, तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना लागले आहे. इतकाच मात्र खरं..
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम