बैलांना आंघोळ घालण्यासाठी सूर नदीच्या पुरात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

बैलांना आंघोळ घालण्यासाठी सूर नदीच्या पुरात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू

जामनेरः तालुक्यातील देऊळगाव येथील सूर नदीच्या पुरामध्ये बुडाल्याने सुशील सुनील इंगळे (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील देऊळगाव येथील सुशील सुनील इंगळे हा तरुण गावाशेजारी असलेल्या सूर नदीत आपल्या बैलांना आंघोळ

घालण्यासाठी सुर नदीकाठी गेला होता.

यावेळी पाय घसरल्याने तो नदीत पडला व नदीचा प्रवाह जोरदार असल्याने तो खोल पाण्यात गेला आणि दुर्दैवाने पाण्याच्या लाटांमध्ये बुडून गेला.

गावकऱ्यांनी आणि उपस्थितांनी सुशीलला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु पाण्याचा जोर जास्त असल्याने सारे प्रयत्न व्यर्थ ठरले व सुशील
च्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे अनपेक्षित घटनेमुळे देवळसगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम