
बोदवडमध्ये तलवार व कोयता घेऊन दहशत माजवणारा युवक जेरबंद
बोदवडमध्ये तलवार व कोयता घेऊन दहशत माजवणारा युवक जेरबंद
जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड येथे हातात तलवार आणि कोयता घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे साडेचार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक युवक तलवार व कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्यानंतर, त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ प्रितम पाटील, पो. अं. रविंद्र चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय २६, रा. माळी वाडा, बोदवड) हा तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवीत असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
त्याच्याकडून अंदाजे ४,५०० रुपये किमतीचे शस्त्रसमान जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम