
बोरखेडा येथे नवतरुण शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ६० हजारांचे नुकसान
बोरखेडा येथे नवतरुण शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ६० हजारांचे नुकसान
बोरखेडा (ता. धरणगाव) येथील तरुण शेतकरी रवींद्र विजय पाटील यांच्या शेतात गुरुवारी रात्री अज्ञात माथेफिरू व्यक्तीने वांगे लागवडीचे अंदाजे १०० ते १५० झाडे कापून टाकली. यासोबतच ड्रीप सिंचन यंत्रणेच्या नळ्याही कापून नुकसान केले आहे. या प्रकारामुळे त्यांचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रवींद्र पाटील यांनी बियाणे आणि ड्रीपसाठी कर्ज घेतले असून, या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे. कर्ज फेडण्याची चिंता त्यांना भेडसावत आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात धरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून गावकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम