बोरखेडा शिवारात वांगे पिकाची तोडफोड; शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

बातमी शेअर करा...

बोरखेडा शिवारात वांगे पिकाची तोडफोड; शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

धरणगाव | प्रतिनिधी : बोरखेडा शिवारातील प्रगतशील आणि नवतरुण शेतकरी रवींद्र विजय पाटील यांच्या शेतातील वांगेच्या पिकाची अज्ञात माथेफिरूंनी गुरुवारी (दि. २९ मे) रात्री तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत १०० ते १५० वांगेच्या झाडांची तोडफोड करण्यात आली असून, ड्रीप सिंचन यंत्रणाही नष्ट करण्यात आली आहे. या नुकसानाची एकूण किंमत सुमारे ५० ते ६० हजार रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याच्या संकटात भर

रवींद्र पाटील यांनी वांगे लागवड करण्यासाठी ड्रीप यंत्रणा व बियाणे यासाठी कर्ज घेतलेले असून, अशा प्रकारच्या हेतुपुरस्सर नुकसानामुळे त्यांच्यासमोर आता कर्जफेडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला हा नवतरुण शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे पूर्णतः हतबल झाल्याचे बोलले जात आहे.

 

घटनेनंतर रवींद्र पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम