बोरखेडे खुर्द तालुका यावल शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

बोरखेडे खुर्द तालुका यावल शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सर्व शाळांनी सहभागी व्हावे – विश्वनाथ धनके यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी -*शाळेतील प्रत्येक मुलास ज्ञानरूपी पुरेपूर अनुभव मिळाल्यास चांगल्या क्षमतेचे विद्यार्थी शाळेतून शिकतील व खऱ्या अर्थाने शाळेचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल असा विश्वास श्री विश्वास धनके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल यांनी आपल्या उद्बोधनातून व्यक्त केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडे खुर्द येथील शिक्षण परिषदेत बोरखेडे केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थान ग. स. सोसायटीचे संचालक श्री योगेश इंगळे यांनी भूषवले. परिषदेला प्रमुख पाहुणे श्री विश्वास धनके गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यावल, श्रीमती सरोज पाटील आदिवासी बीट विस्तार अधिकारी तसेच कठोरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महम्मद एस. तडवी साहेब उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पुजनाने शिक्षण परिषदेची सुरुवात झाली. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री राजेंद्र सोनवणे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास धनके यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देऊन शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या या उपक्रमात सर्व शाळांनी सहभागी व्हावे व नोंदणी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती सरोज पाटील यांनी पेसा क्षेत्रातील विद्यार्थी यांच्या वाहतूक सुविधा व विद्यार्थी सुरक्षा, यंत्रणा, विद्यार्थी उपस्थिती तसेच शाळांमध्ये ग्रामस्थांचा व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी यावल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आदिवासी भागातून प्रथम क्रमांक मिळालेल्या श्री अजित तडवी जि प शाळा बोरखेडे खुर्द यांचा सत्कार करण्यात आला. विषय पत्रिकेनुसार मागील महिन्याचा आढावा या विषयावर उज्वला सोनार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. सकारात्मक शिस्त या विषयावर श्री योगेश इंगळे यांनी मार्गदर्शन करून शिक्षण परिषदेबद्दल गौरौदगार काढले. परिषदेत माझा वर्ग माझे नियोजन या विषयावर कल्पना माळी, आपत्ती व्यवस्थापन या विषयावर शुभांगी पाटील यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख श्री एम एच तडवी यांनी प्रशासकीय विषय व केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री हुसेन तडवी व आभार प्रदर्शन समीर तडवी यांनी केले. केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी परिषदेला उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम