ब्रह्मश्री परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न; छाया माचवे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

ब्रह्मश्री परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न; छाया माचवे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) – ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या यशाला दाद मिळावी या उद्देशाने ब्रह्मश्री परिवार दरवर्षी हा उपक्रम राबवतो.

कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरल्या थिंकिंग इन्फोटेकच्या संचालिका छाया माचवे, यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवड, वेळेचे नियोजन, बदलती शैक्षणिक दिशा यावर प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांनी आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले.

९ वी ते १२ वी मध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेव्हज क्लासेस येथे सन्मान करण्यात आला. सौ. मानसी भूपेश कुलकर्णी व सौ. स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी” या उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप भेट दिले. त्याचे संगोपन करून पर्यावरण रक्षणात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

रेखा कुलकर्णी, आमला पाठक, ऋतुजा संत, छाया वाघ, भाग्यश्री राव, सुषमा किर्तने, योगिता कुलकर्णी, सरिता क्षिरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण पार पडले. सुत्रसंचालन प्रसाद निशाणदार व प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यमान अध्यक्ष कमलाकर फडणीस, डॉ. निलेश राव, दीपक महाजन, उल्हास जोशी, उमेश ओक, उदय खेडकर, भूपेश कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. वेव्हज क्लासेसचे अभय कुलकर्णी यांनी आपली जागा उपलब्ध करून देत महत्त्वाचे सहकार्य केले.

उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम