ब्रह्माकुमारी समाजाची सेवा करीत आहेत – प.पू.शंकरजी महाराज

भव्य आध्यात्मिक मेळ्याचे थाटात उद्घाटन

बातमी शेअर करा...

ब्रह्माकुमारी समाजाची सेवा करीत आहेत – प.पू.शंकरजी महाराज

भव्य आध्यात्मिक मेळ्याचे थाटात उद्घाटन
खामगाव प्रतिनिधी
प्रत्येकाने परमात्म्याच्या मार्गाने चालले पाहिजे, त्यामुळे आयुष्य अंधकारमय होत नाही. तसेच माझे आणि दुसर्‍यांचेही कल्याण झाले पाहिजे अशी भावना ठेवली पाहिजे. समाजात ब्रह्माकुमारी ज्ञान देण्याचे कार्य करीत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे, असे उदगार जागृती आश्रमचे मठाधीपती प.पू.शंकरजी महाराज यांनी येथे काढले. तसेच मनुष्य सेवा पेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही, असेही सांगितले.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालय शाखा खामगावच्या वतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदानावर आयोजीत भव्य आध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन २४ फेब्रुवारी रोजी प.पु. शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सदर मेळा गुरूवार दि.२७ फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे.

या मेळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून खामगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव महादेवराव भोजने, अभिनेत्री सौ गौरीताई थोरात, उद्योगपती सतीश राठी , राजेश वसंत वाणी , प्रा. गुंजकर , डॉ. प्रतीक वराडे ,डॉ. आनंद राठी उपस्थित होते. याप्रसंगी दीपप्रज्वलनाने या मेळ्याची सुरुवात करण्यात आली. नंतर उपस्थित मान्यवरांचे औक्षवंत व फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच राजयोग मेडिटेशनद्वारे व्यसनमुक्त व नैराश्यमुक्त होऊन ईश्वरीय सेवेत सदैव योगदान देणारे प्रकाश लाहुडकर, रजनी खंडेलवाल , राजेश मुंग्यालकर, निर्मला फेरण, संगीता चौधरी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तर प्रास्ताविकातून ब्रह्माकुमारी सुषमादीदी यांनी राजयोग मेडिटेशनद्वारे व्यसन आणि टेन्शनमुक्त जीवन जगता येते. त्यामुळे शहरवासीयांनी व्यसनमुक्त व मानसिकदृष्ट्या सशक्त व्हावे, याच उद्देशाने सदर अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना महादेवराव भोजने यांनी सर्वांनी सेवेला महत्व दिले पाहिजे, असे सांगून दुसर्‍यांचा विचार करतो तो धनाने,मनाने श्रीमंत होतो, असे सांगून समाज सेवा वाढविण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी कलावंत व अभिनेत्री गौरीताई थोरात यांनी मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी ब्रह्माकुमारीज्चे ज्ञान समजावून घेणे, स्वतःला ओळखणे तर पवित्रता शुध्दता प्राप्त करणे महत्वाचे असल्याचे सांगून माँ जिजाऊ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी देण्याचा विचार केला तेव्हा इतिहास घडविल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बी.के. शकुंतलादीदी यांनी आरोग्य तथा व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सहस्त्र शिवलिंग दर्शन, भव्य कुंभकरण झाकी, रोमांचकारी थ्रीडी शो ,भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन आणि ३६ फूट उंच शिवलिंगाचे दर्शन अशा विविध स्टॉलच्या माध्यमातून ईश्वरी दिव्य संदेश प्राप्त करून स्वतःचे जीवन सार्थक करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा खामगाव च्या वतीने डॉ. प्रतीक वराडे व डॉ. प्रतिमा राठी मोफत दंत तपासणीची सेवा देत आहेत. कार्यक्रमाचे संचालन मेघा अग्रवाल यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम