ब्रह्माकुमारीज् तर्फे सोरटी सोमनाथचे रत्नजडित प्रतिकात्मक शिवलिंग ठरले भाविकांचे आकर्षण

शिवधाम निमखेडी आणि उमाळा येथेही कार्यक्रम :

बातमी शेअर करा...

ब्रह्माकुमारीज् तर्फे सोरटी सोमनाथचे रत्नजडित प्रतिकात्मक शिवलिंग ठरले भाविकांचे आकर्षण
शिवधाम निमखेडी आणि उमाळा येथेही कार्यक्रम :
जळगाव प्रतिनिधी

: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय जळगाव सेवाकेंद्रातर्फे महाशिवरात्री निमित्त श्री ओंकारेश्वर शिवमंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराचे रत्नजडित प्रतिकात्मक शिवलिंग हजारो भाविकांचे आकर्षण ठरले. त्याबरोबर अनेकाविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रह्माकुमारीज् तर्फे श्री ओंकारेश्वर शिव मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य श्री सोरटी सोमनाथ रत्नजडित शिवलिंगाचे प्रतिकात्मक भव्य शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली. शिवभक्तांचे आकर्षण ठरलेल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी सकाळ पासूनच रांग लागली होती. त्याचबरोबर आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी आणि राजयोग ध्यानकक्षाचीही निर्मिती करण्यात आली होती. सकाळी ढाके कॉलनीस्थित मुख्य सेवाकेंद्रात शिवध्वजारोहण ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, नितीन लढ्ढा, कैलास शर्मा, डॉ. निशा पाटील लताताई भोईटे, धीरज सोनी, मधुकर सोनार, ज्योती पाटील, संदिप पाटील, रविंद्र शर्मा, बी.के. नंदादीदी, बी.के. वैशाली, बी.के. वर्षा, बी.के. राज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी अवगुणमुक्त, व्यसनमुक्तीचीही शिवप्रतिज्ञा उपस्थितांनी केली.

शिवधाम निमखेडी आणि उमाळा येथेही कार्यक्रम :
निमखेडी येथील शिवधाम मंदिरातही भगवान शिवाचे चरित्र आणि महिमा सांगण्या·या आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचे आयोजन तसेच उमाळा येथे अज्ञाननिद्रेतील कुंभकर्ण रुपी मानव समाजाचे प्रतिकात्मक देखावा लाईट आणि साऊंड स्वरुपात साकारण्यात आलेला आहे. तसेच शिव मंदिरातही शिव महिमा चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम