ब्रह्माकुमारीज् जळगाव आयोजित रक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद

बातमी शेअर करा...

ब्रह्माकुमारीज् जळगाव आयोजित रक्तदान शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद
देशभरात एक लाखाच्या जवळ रक्तदात्यांनी केले रक्तदान

जळगाव (प्रतिनिधी) ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्माकुमारीज् जळगाव ढाके कॉलनी सेवाकेंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नव्वद पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

ब्रह्माकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळात रक्तदान महाअभियान शिबिर आयोजित केले गेले.  ब्रह्माकुमारीज् विद्यालय, ढाके कॉलनी मध्ये सकाळी शिबिराचे उदघाटन ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका मिनाक्षीदीदी, इंडियन रेडक्रासचे सोसायटी रक्त केंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. किरण पाटील, डॉ. अंकुश कोलते, ब्रह्माकुमार मधुकर सोनार आदिंच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिरास इंडियन रेडक्रॉस सोसायटी,जळगाव युनिटचे डॉ. प्रकाश जैन, रक्त संक्रमण अधिकारी, डॉ. सिमा शिंदे, टेक्शिनियन, संजय साळुंखे, सहायक, सुभाष पाटील, सहायक  यांचे सहकार्य लाभले.

देशभरात  एक लाखापेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे उदिष्ठ आहे. तीन दिवस चालेल्या या शिबिरात भारत आणि नेपाळ सहित ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरातून ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड होणार असल्याचे डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य मीडिया कॉर्डिनेटर, मीडिया प्रभाग माऊंट आबू यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम