
ब्राम्हणशेवगे परिसरात चक्रीवादळासह पावसाचे थैमान
ब्राम्हणशेवगे परिसरात चक्रीवादळासह पावसाचे थैमान
चाळीसगाव : तालुक्यातील ब्राह्मणशेवगे परिसरात चक्रीवादळासह पावसाने थैमान घातले. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक संचाचेही नुकसान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यात महिन्याच्या पहिल्या मे आठवड्यापासून अवकाळी तर आता मान्सूनचा पाऊस व वादळाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, १४ जून रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात अचानक
चक्रीवादळ व पावसाने थैमान घातले. अचानक चक्रीवादळ तसेच विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शेतात कपाशी, मका आदी पिकांची पेरणी करणाऱ्या मजूरांसह शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. या वादळामुळे डेरेदार व मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच ब्राम्हणशेवगे येथील बाळासाहेब मुरलीधर बाविस्कर यांच्या शेतात पसरवलेला ठिबक संच वादळामुळे इतरत्र विखुरला गेला. तसेच मोठमोठी दोन कडूलिंबाची झाडेही उन्मळून पडली आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम