
भटके विमुक्त समाजाचा सन्मान दिन ३१ ऑगस्ट रोजी साजरा होणार
जळगाव: ब्रिटिश सरकारने १८७१ साली लागू केलेल्या ‘क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट’मुळे गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेल्या भटके विमुक्त समाजाच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट रोजी ‘सन्मान दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा जुलमी कायदा रद्द करून या समाजाला ‘विमुक्त’ म्हणून घोषित करण्यात आले होते.
हा दिवस या समाजाच्या संघर्षाचे आणि योगदानाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे.
३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता के.सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज, नॅशनल हायवे ६, आय.एम.आर. कॉलेजजवळ, जळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम