
भडगाव तालुक्यात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल
भडगाव तालुक्यात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल
भडगाव – तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, भडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील एका गावातील ही अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह भडगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरी एकटी असताना संशयित पुटीया जुबनसिंह बारेला, रा. डोंगलया पानी वरला, जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याने घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर, आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडितेने सांगितले.
घटनेनंतर घाबरलेली मुलगी काही दिवसांनी नातेवाईकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पुटीया जुबनसिंह बारेला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम